माहिती सेवा समिती हवेलीच्या वतीने सफाई कामगारांना मिठाईचे वाटप
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे माहिती सेवा समिती हवेलीच्या वतीने सफाई कामगारांना माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या हस्ते माहिती सेवा समितीचे हवेली तालुकाध्यक्ष कमलेश बहिरट, उद्योजक विशाल बहिरट यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत मिठाई व दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या कार्यकाळात वाघोली गावातील सफाई कामगारांनी जीवाची पर्वा न करता कचरा संकलनाचे काम करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. कामगारांची दिवाळी आनंदात जावी या उदात्त हेतूने माहिती सेवा समितीच्या वतीने दिवाळी निमित्त कामगारांना मिठाई व दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समितीचे हवेली तालुकाध्यक्ष कमलेश दादा बहिरट, उद्योजक विशाल बहिरट, अतुल भाडळे, डॉ. अनिल पायमोडे, वाघेश्वर उद्योगसमूहाचे विजय गायकवाड, बालाजी उद्योग समूहाचे चेअरमन किरण जाधवराव, व्हॉ. चेअरमन आकाश कटके, बालाजी उद्योग समूह कार्याध्यक्ष सागर जाधव, संघटक सतीश जगताप, सुरेश जगताप, नंदमोहन एंटरप्राइजेसचे अजित साळुंके, महिला बचत गटाच्या मोहिनी तांबे, पारूबाई गायकवाड, शितल तांबे, सोनाली गायकवाड, समीर पठारे, नरेश भोर, राहुल मुरूमकर, विक्रम गडदे, रवी म्हेत्रे, अविनाश इंदुलकर, मिडगुले आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सफाई कामगारांनी कचरा संकलन करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. कामगारांच्या कुटुंबांची दिवाळी आनंदात जावी या उदात्त हेतूने माहिती सेवा समितीच्या वतीने मिठाई वाटप करून खारीचा वाटा उचलला आहे.
– कमलेश बहिरट (हवेली तालुकाध्यक्ष मा. से. समिती)