बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास अटक
येरवडा तपास पथकाची कामगिरी; सहा महिन्यांपूर्वीच येरवडा कारागृहातून आला होता बाहेर
येरवडा : मकोकाच्या गुन्ह्यातील नुकताच सहा महिन्यांपूर्वी येरवडा जेल कारागृहातून बाहेर पडलेल्या सराईताला बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी येरवडा तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
अभिषेक नारायण खोंड (वय २३ रा. लोहगाव रोड, वाघोली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकाचे पोलीस हवालदार कैलास डुकरे व पोलीस अंमलदार सुशांत भोसले हे बुधवारी (दि. १७ एप्रिल) गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अभिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगावशेरी भागातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कोणाचीतरी वाट बघत थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी पथकासह सदर ठिकाणी जाऊन अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एक पिस्टल व २ राऊंड मिळून आले. पोलीस कस्टडी तपासादरम्यान त्याचेकडून आणखी एक पिस्टल व २ राऊंड असा ६५ हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, , पोलीस उप आयुक्त विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त आरती बनसोडे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोह गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केले आहे.