Trending
वाघोलीतील अनधिकृत रो हाऊस बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई

वाघोली : वाघोली येथील जगताप वस्ती परिसरातील गट नंबर ३६५ मधील अनधिकृत रो हाऊसच्या बांधकामावर पीएमआरडीएच्या वतीने गुरुवारी (दि.१४) कारवाई करण्यात आली. ४ पोकलँडच्या मदतीने बांधकाम पाडण्यात आले. पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएने केलेल्या कारवाईने मात्र वाघोली परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. याचअनुषंगाने १० दिवसांपूर्वी पीएमआरडीएचे सहाय्यक नगररचनाकार ऋतुराज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोनू वासुदेव अगरवाल यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.