शंभूला पैलवान बनवायचे होते

बॉल लागून मृत्यू झालेल्या शंभूच्या कुटुंबियांचे स्वप्न राहिले अधुरे

लोहगाव : (उदय पोवार) मी घरातून निघताना शंभू माझी गाडी अडवून पपी घेत असे, घरातील इतर मुलांपेक्षा धाडसी असणाऱ्या शंभूला मला पैलवान बनवायचे होते. त्यासाठी त्याला दोन महिने तालमीमध्ये देखील घातले होते. पण अचानक काळाने झडप घातली अन् शंभू आमच्यातून कायमचा निघून गेला. हसता खेळता शंभू निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याची भावना व्यक्त करत शंभूचे चुलते बंडू खांदवे यांना अश्रू अनावर झाले.

क्रिकेट खेळत असताना बॉल अवघड जागेवर लागल्याने अकरा वर्षीय शोर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११, रा. लोहगाव, पुणे) याचा दुर्देवी मृत्यू दोन दिवसापुर्वी झाला.  हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बंडू खांदवे यांना शंभूच्या आठवणी सांगताना दुःख अनावर झाले.

ते म्हणाले, आमचे आजही तिघा भावांचे ४१ जणाचे एकत्र कुटुंब आहे. शंभू मला पप्पा म्हणून बोलवत असे. पुण्यातील नामाकिंत शाळेत इय्यता सहावीमध्ये शिकत होता.  देखणा, हरहुन्नरी, धाडसी, हुशार असे सर्व गुण त्याच्यात होते. मी घराबाहेर जाताना किंवा आले नंतर गाडी अडवून माझी पप्पी घेत असे. गुरुवारी (दि.२ मे) सायंकाळी मी कार्यक्रमाला जाताना माझ्यावर कुणाचे जास्त प्रेम आहे हे दाखवण्यासाठी घरातील इतर मुलांसोबत माझी पप्पी कोण जास्त घेण्याची चढाओढ लागली. अन् सहाजकिच शंभूने जास्त पप्पी घेतल्या. अन् त्याने पप्पा मी जास्त घेतल्याचे त्याने आवर्जून जाताना सांगीतले. मी कार्यक्रमाला निघून गेलो.  तो नेहमीप्रमाणे घरातील मुलांसोबत खेळायला गेला.

जगद्गुरू स्पोर्ट्स अॅकडमी मध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये शंभू बॉलिंग करत असल्याचे दिसते. त्यांनी टाकलेला बॉल बॅट्समनने जोरात मारल्याने बॉल सरळ येऊन शंभूच्या अवघड जागेवर येऊन आदळला. शंभू खाली पडला. परत वर उठला अन् लगेच खाली पडला. त्यानंतर उठलाच नाही.  त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथून पुढील रुग्णालयात पाठवले. तोपर्यंत उशीर झाल्याने शंभूची प्राणज्योत मावळली.

शंभूला मला पैलवान करायचे होते. दोन महिने त्याला तालमीत देखील पाठवले होते. तालमीत जाऊन आल्यानंतर मोठ्यांचे पाय धरून आशिर्वाद घेत होता. शंभू तुझ्यात इतका बदल कसा झाला. यावर हीच तर खरी पैलवानाची ओळख असल्याचे शंभू ताडकन बोलला. बैल, घोडा, गाडीचा चाहता असणाऱ्या शंभूच्या आठवणी जितक्या सांगाव्या तितक्या कमीच असल्याचे सांगून बंडू खांदवे यांचे डोळे पान्हावले.

मुलांनी खेळताना सुरक्षा साधनांचा वापर करावा

शंभूचा आकस्मित मृत्यू झाल्याने खांदवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. असा प्रकार इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी क्रिकेट अथवा कोणताही खेळ खेळताना सुरक्षितेचा साधनांचा वापर करूनच खेळावे असे आवाहन शंभूचे चुलते (पप्पा) बंडू खांदवे यांनी केले आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button