काळूबाई नगर मधील ड्रेनेजच्या कामाला सुरुवात
माजी उपसरपंच संदीप सातव यांची माहिती

वाघोली : वाघोली येथील काळूबाई नगर मधील उर्वरित ड्रेनेजचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचा ड्रेनेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती माजी उपसरपंच संदीप सातव यांनी दिली.
वाघोलीतील काळूबाई नगर मधील ड्रेनेजचे काम करण्यात आले होते. परंतु काही काम करणे बाकी राहिले होते. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत येथील महिलांनी संताप व्यक्त करत तात्काळ दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन बाळासाहेब सातव (सर), माजी उपसरपंच संदीप सातव, राजू सातव, पप्पू सातव यांच्या पुढाकाराने त्याच दिवशी ड्रेनेजच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता बाळासाहेब सातव (सर), पप्पू सातव, राजूशेठ सातव यांच्या स्वताःच्या मालकीच्या जागेत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल काळूबाई नगर येथील नागरिकांनी आभार मानले. ड्रेनेज लाईनेचे काम चालू करण्यात आले असून आठ दिवसांमध्ये मार्गी लागला असल्यामुळे येथील रहिवाशांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती संदीप सातव यांनी दिली.