Trending

वाघोली येथे ‘ट्रॉमा केअर युनिट’ला मान्यता  

माजी जि.प. सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘विशेष बाब’ म्हणून मान्यता

वाघोली : वाघोलीतील केसनंद फाट्यावर असणाऱ्या साडेतीन एकर गायरान जागेमध्ये सिविल  हॉस्पिटल व ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरु करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. तसेच आरोग्यमंत्री सावंत यांच्या माध्यमातून दाभाडे यांचेकडून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरु होता. रामभाऊ दाभाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वाघोली येथे ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ट्रॉमा केअर युनिट’ स्थापना करणेबाबत शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. लवकरच ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरु होणार असल्याची माहिती रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे.

वाघोली येथे केसनंद फाट्यालगत (गट नं. १११९ व ११२३) साडेतीन एकर गायरान जागा आहे. वाघोली ग्रामपंचायत असताना या जागेवर माजी जि. प. सदस्य दाभाडे यांच्या पुढाकाराने प्रशस्त असे ग्रामसचिवालय उभारण्यात येणार होते. यासाठी साडेतीन एकर जागा महाराष्ट्र शासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या नावे वर्ग देखील करून घेतली होती. परंतु वाघोली गावचा महापालिकेमध्ये सामवेश झाला आणि ग्रामसचिवालय होऊ शकले नाही. त्यानंतर दाभाडे यांनी सदर जागेवर सिविल हॉस्पिटल व ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करण्याची मागणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार दाभाडे यांनी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय स्तरावरील पाठपुरावा सुरूच ठेवला होता. प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथे ‘ट्रॉमा केअर युनिट’ स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यामुळे सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथे ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ट्रॉमा सेंटर युनिट’ स्थापनेबाबत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर ‘ट्रॉमा केअर युनिट’ करता विविध पद्धतीने जागा उपलब्ध करून तेथे बांधकाम व पद निर्मिती करणेबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल असे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे.

वाघोली गाव पुणे-नगर महामार्गावरील मुख्य गाव आहे. वाघोली गावाची लोकसंख्या दोन ते अडीच लाखा इतकी आहे. तसेच वाघोली गावाला जोडणारी पूर्व भागातील २५ गावे आहेत. वाघोली गावात सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असणारे कोणतेही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे वाघोली, लोणीकंद, शिक्रापूर, शिरूर व नगरहून येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी पुणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये जावे लागते. पुण्यामध्ये जाण्यासाठी वाघोली मधूनच रुग्णांना जावे लागते. वाहतूक कोंडीमुळे कित्येक रुग्णांना वेळेमध्ये उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावा व आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने जि.प. सदस्य रामभाऊ यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. दाभाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली येथे ‘एक विशेष बाब’ म्हणून ‘ट्रॉमा केअर युनिट’ स्थापन करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून माजी जि. प. सदस्य रामभाऊ दाभाडे व ग्रामस्थांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

– महेंद्र भाडळे (माजी उपसरपंच, वाघोली)

Download in JPEG format

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button