तहसिल कार्यालयात एजंटगीरी करणाऱ्यांवर होणार कारवाई
आमदार अशोक पवार यांनी दिल्या तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सूचना

शिरूर : शिरूर तहसिल कार्यालयात एजंटगीरी करताना कोणी आढळुन आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या सुचना तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना दिल्या असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी बोलताना सांगितले.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेची बैठक शुक्रवार (दि.२७ ऑगष्ट) रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी आमदार पवार बोलत होते.
यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष सुदिप गुंदेचा, तहसिलदार लैला शेख, घोडगंगाचे उपाध्यक्ष अॅड. रंगनाथ थोरात, सदस्य अॅॅड. रविंद्र खांडरे, रंजन झांबरे, रामभाऊ शेटे, चेतना ढमढेरे, गोरक्ष तांबे, सचिन पंडित आदि उपस्थित होते.
गोर गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने संजय गांधी योजनेतुन एक हजार रूपये पेंशन मिळत असते. या योजनेचा फायदा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळावा यादृष्टीने समितीमधील सर्वांनी पुढाकार घेऊन त्यासाठी लागणारे दाखले मिळवुन देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी केले.
९८ पैकी ८४ प्रकरणे मंजूर
संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेसाठी ९८ प्रकरणे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ८४ प्रकरणे मंजुर आहेत व १४ प्रकरणे त्रुटींमुळे नामंजुर झाले आहेत.