महिला कपडे बदलताना चित्रीकरण करणाऱ्या बाबावर गुन्हा दाखल 

तुळापूर येथील घटना

वाघोली : दोष दूर करण्यासाठी पूजा करायला गेलेल्या महिलेचा आंघोळी नंतरचे कपडे बदलतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या बाबावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोष दूर करण्यासाठी पूजा करायला गेलेल्या महिलेचा आंघोळी नंतरचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये काढणाऱ्या बाबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे घडली.
अमोल विजय टोनगावकर (वय ३६ वर्षे, रा. गुलमोहर पार्क, बकोरी फाटा, वाघोली) असे गुन्हा दाखल केलेल्या बाबाचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला दोष दूर करण्यासाठी कुटुंबियांसह बाबा सोबत तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे गेली.
पुजा झाल्यानंतर तिला व तिचा पती नदीत आंघोळ करुन आल्यानंतर पीडित महिलेला बाबाने पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. ती कपडे बदलत असलेल्या खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या बाबाच्या बॅगे शेजारी एक मोबाईल ठेवण्यात आला. फोन दिसल्याने महिलेला शंका आली. त्यामूळे तिने तो मोबाईल हातात घेवुन पाहीला असता तो बाबाचा कोण असल्याचे लक्षात आले. कोणता तपासला असता त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग चालु होती.  बाबांनी कपडे बदलतानाचे चित्रीकरण करण्यासाठी तो मोबाईल ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर तीने पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button