वाघोली-केसनंद राज्य मार्ग बनला धोकादायक

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांचा आंदोलनाचा इशारा; वाहनधारकांसह नागरिकांचा जीव टांगणीला

वाघोली  :  वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली केसनंद राज्य मार्गाच्या संथगतीने चाललेल्या कामामुळे वाघोलीमधील तसेच पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रोज अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येत्या आठ दिवसात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

वाघोली-केसनंद रस्त्याचे काम साधारणपणे १५० मीटर अंतरापर्यंत अत्यंत संथगतीने एका बाजूचे काम चालू आहे. तसेच रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील ढासळलेला आहे. झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप संदीप सातव यांनी केला आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची खड्डे बुजवले गेले नसल्याने खड्ड्यांच्या मालिकेमधून नागरिकांना आपली वाहने तारेवरची कसरत करून काढावी लागत आहेत. रस्त्यासाठी ठेकेदाराने अन्य एका खाजगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्याच्याकडून हे काम चालू असून वाहतूक कोंडी मध्ये मोठ्याप्रमाणात भर पडली आहे. याशिवाय या रस्त्याच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी काम चालू असताना उपस्थित रहात नसल्याचे चित्र देखील दिसून येत आहे. रात्री-अपरात्री प्रवास करताना रस्त्याच्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना करणे आवश्यक असताना देखील ठेकेदारांने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रात्री अपरात्री अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते लक्ष देऊन नागरिकांचा जीव घेणा प्रवास थांबवला नाही तर नागरिकांच्या होणाऱ्या व यापूर्वी झालेल्या अपघाताला जबाबदार धरत लोणीकंद पोलिस ठाण्यात यासंदर्भात बेकायदेशीर ठेकेदार व  अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संदीप सातव यांनी सांगितले.

भाजपने केले होते आंदोलन  :

वाघोली-केसनंद रस्त्यासाठी भाजप हवेली तालुका क्रीडा आघाडी अध्यक्ष विजय जाचक, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव यांच्या नियोजनाखाली भाजपने काही दिवसापूर्वी आंदोलन देखील केले होते. या आंदोलनामध्ये संदीप सातव, पंचायत समिती सदस्य शाम गावडे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, प्रदीप हवेली तालुका उपाध्यक्ष सातव पाटील महिलावर्ग मोठ्यासंख्येने सहभागी झाला होता. आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना जीव मुठीत रस्ता क्रमण करावा लागत आहे.

रस्त्याचे काम सुरू असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तातडीने उपयायोजना करण्यात येतील. किरण उंद्रे नावाची व्यक्ती माझ्या येथे कामाला आहे.

– तुकाराम देवकर (अधिकृत ठेकेदार)

 

रस्त्याचे काम मी घेतले असून प्रत्येक दोन दिवसाला खड्डे बुजवले जात असून येत्या दहा दिवसात रस्त्याच्या दुसऱ्या पट्ट्याचे काम करण्यात येणार आहे.

– किरण उंद्रे (ठेकेदार)

 

सदर रस्त्यासाठी किरण उंद्रे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत की काय माहित नाही. देवकरच रस्त्याचे अधिकृत ठेकेदार आहेत. खड्डे बुजवले जातील व वाहतुकीच्या व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येतील.

– सचिन देशमाने (शाखा अभियंता सा. बां. विभाग)

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button