शिरूर मुख्यबाजार समितीत मुगाची आवक
मुग विक्रीसाठी आणताना वाळवुन, चाळणी करून आणल्यास चांगला भाव मिळण्यास मदत होईल - अॅॅड. वसंतराव कोरेकर
शिरूर : (बबन वाघमारे) मुग विक्रीसाठी आणताना वाळवुन, चाळणी करून ५० किलो पर्यंतचे बारदानमध्ये आणावा. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल असे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅॅड. वसंतराव कोरेकर सांगितले.
मुख्यबाजार समिती शिरूर (ता. शिरूर) येथे यार्डवर आवक झालेल्या मुग लिलावाची पाहणी बाजार समितीचे सभापती ॲड. वसंतकाका कोरेकर यांनी करून शेतकऱ्यांच्या मुग व इतर शेतमालास जास्तीत जास्त बाजार भाव कसा देता येईल याबाबतच्या सुचना आडतदार व व्यापारी यांना दिल्या.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती प्रविण चोरडिया, माजी सभापती व संचालक शशिकांत दसगुडे, सचिव अनिल ढोकले यांसह आडतदार, व्यापारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यबाजार शिरूर व उपबाजार तळेगांव ढमढेरे यार्डवर मुगाची मोठ्याप्रमाणावर आवक सुरू झालेली असुन बाजारभावही चांगले निघत असल्याचे बाजार समितीचे उपसभापती प्रविण चोरडिया म्हणाले.
शनिवार (दि. २१ ऑगष्ट) रोजी मुख्ययार्ड शिरूर येथे ६८० डाग व उपबाजार तळेगांव ढमढेरे यार्डवर ७४५ डाग मुगाची आवक झालेली असुन कमीत कमी ६००० जास्तीत जास्त ७००० व सरासरी ६५०० प्रतिक्विंटल दर मिळाले असल्याचे बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले.