जुन्नर तालुक्यातील विकास कामांना ३६ कोटी रुपये मंजूर – आमदार अतुल बेनके
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २४-२५ अंतर्गत २५४ कामांना ३६ कोटी १ लक्ष ५० हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेतून स्मशानभूमी सुधारणा करणे, गटर करणे, स्मशानभूमी वेटींग शेड बांधणे, अंतर्गत रस्ते, नवीन शाळा वर्ग खोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम इमारत, छो पा/कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्ती व नूतनीकरण, ३०-५४ रस्ते, ५०-५४ रस्ते या कामासाठी निधी मंजूर झाला असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.
आमदार अतुल बेनके यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जन सुविधा मध्ये १४८ कामांना १५ कोटी ५४ लक्ष रुपये, नागरी सुविधा योजनेअंतर्गत ४४ कामांना ४ कोटी ६२ लक्ष रुपये, ग्रामीण रस्ते (३०-५४) २० कामांना ५ कोटी रुपये, इतर जिल्हा रस्ते (५०-५४) ५ कामांना २ कोटी ५० लक्ष रुपये, छो.पा/को.प. बंधारे १५ कामांना ३ कोटी ८० लक्ष रुपये, नविन शाळा वर्ग खोल्या बांधकाम १२ कामांना ३ कोटी ४३ लक्ष रुपये, अंगणवाडी इमारत बांधकाम १० कामांना १ कोटी १२ लक्ष ५० हजार रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.