गायरानवस्ती-वाघेश्वरनगर येथे १३ किलो गांजा पोलिसांनी केला जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथक एक ची वाघोलीत कारवाई

वाघोली : वाघोली येथील गायरानवस्ती-वाघेश्वर नगर येथे १३ किलो २२८ ग्रॅम गांजा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक एक ने मंगळवारी (दि. २४) पकडला असून गांजा सोबत बाळगणाऱ्या नितीन मोहन डुकळे (वय २५) याच्यावर एनडीपीएस अॅॅक्ट नुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ७ गांजाची पाकिटे, दुचाकी, मोबाईल असा ३ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व त्यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.