महिला दक्षता कमिटीकडून लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा  

वाघोली  :  लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या महिला दक्षता कमिटीच्या वतीने राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना महिला दक्षता कमीटीच्या वतीने रात्रंदिवस जनसेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना राख्या बांधून बहिण भावांचा अतूट नाते असणारा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला दक्षता कमीटीच्या अध्यक्षा पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार, सचिव सिमा वारघडे पाटील, महिला दक्षता कमीटीच्या सदस्या, हवेली शिवसेना महिला अध्यक्ष अलकाताई सोनवणे, माजी जि.प. सदस्या अर्चनाताई कटके, पंचायत समिती सदस्या संजिवनीताई कापरे, लोचणताई शिवले, लिनाताई कंद, आशाताई तांबे, पिंपरी साडस ग्रामपंचायत सदस्या शिंदे, न्हावी सांडस ग्रामपंचायत सदस्या मिनाताई लोले व महिलावर्ग यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button