रयत शेतकरी संघटनेच्या वतीने यशवंत बचाव जनजागृती मोहिम
अष्टापूर फाट्यावरून मोहिमेस सुरुवात

पुणे : रयत शेतकरी संघटनेकडून यशवंत सहकारी साखर कारखाना गेले दहा वर्षांपासून बंद पडला आहे. कारखाना सुरु करण्यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने यशवंत बचाव जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात अष्टापूर फाटा येथून करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षांपासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे. कारखाना सुरु करावा यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथून यशवंत बचाव जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. कारखान्याच्या प्रत्येक सभासद, कामगाराने जागृत होऊन कोणतेही एकजुटीने राहिल्यास कारखाना सुरु झाल्या शिवाय राहणार नाही अशा पद्धतीची ध्वनिक्षेपनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. रयत शेतकरी संघटनेतील कोणतेही पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राजकारण करायचे नाही, खोटे आश्वासन देण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरलेली नसून यशवंत बचाव हाच प्रामाणिक दृष्टीकोन ठेऊन जनजागृती करण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल यांनी सांगितले.
त्याबरोबर सहकार क्षेत्राचा प्रशासकाचा कालावधी सहा महिने ते एक वर्षाचा असतानाही गेले दहा वर्षांपासून निवडणूक लावण्यात आली नाही, कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे धुळ पडलेला आहे. कारखाना चालू करण्यासाठी मोलाचा वाटा असणारे खासदार कै. आण्णासाहेब मगर या थोर पुरुषांच्या पुतळ्याची सुद्धा देखभाल केली जात नसल्यामुळे अशा थोर पुरुषांचा अवमान होत असल्याचा खेद शेतकरी संघटनेने व्यक्त केला.
याप्रसंगी रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष रविप्रकाश (बाप्पुसाहेब) देशमुख, दौड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती मारूती बापू मगर, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष सुशिल शिंदे, कार्याध्यक्ष हेमंत चौधरी, तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल, उपाध्यक्ष सुभाष टिकोळे, कार्याध्यक्ष नितिन इगळे, संदिपान भोरडे, योगेश शितोळे, संदिप शिवले, निलेश वारघडे, सुमित कोतवाल पांडुरंग नागवडे, दादा कोतवाल, पुणे जिल्हा पश्चिम उपाध्यक्ष अनील शिवले, हवेली तालुका युवक सचिव संदीप साठे, हवेली तालुका विभाग प्रमुख सागर पवार, रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आलेले प्रश्न :
यशवंतची निवडणूक गेली दहा वर्षात का झाली नाही.
बँकेने कर्जाची रक्कम जेवढी आहे तेवढीच जमित ताब्यात घेण्याऐवजी संपूर्ण जमीन ताब्यात का घेतली?
सभासद व कामगारांची देणी देण्यासाठी प्रयत्न का केला गेला नाही?
राज्य सहकारी बँक कर्जाचा तपशील किती आहे याबाबत माहिती का देत नाही? राज्य सहकारी बँक कारखाना भाडे तत्वावर का देऊ इच्छिते?
कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न का झाला नाही?
महापुरुष माजी खासदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याचे संरक्षण व स्वच्छतेकडे दुर्लक्ष का केले जात आहे?
रयत शेतकरी संघटनेच्या वतीने यशवंत बचाव जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. राजकारण न करता सभासद, कामगारांनी एकजूट दाखविल्यास अनेक वर्षांपासून बंद पडलेला यशवंत सहकारी कारखाना सुरु होऊ शकतो.
– रामदास कोतवाल (पुणे जिल्हाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना)