मोक्यातील आरोपी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी

पुणे : मागील पाच महिन्यांपासून फरार असलेला मोक्यातील आरोपी गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.

ऋषीकेश किसन खोड (वय २४ रा. पांडवनगर, वडकी ता. हवेली जि, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक गुरुवारी (दि. १८ जुलै) हद्दीत गस्तीवर असताना गेली पाच वर्षांपासून फरार असलेला मोक्यातील आरोपी हा सासवड रोडवरील सोनाई हॉटेलसमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत युनिट सहाचे अंमलदार समीर पिलाने यांना मिळाली. सदर ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने सापळा रचला. परंतु पोलीस आल्याचे लक्षात येताच आरोपीने येथून पळ काढला. मात्र पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

आरोपी विरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात त्याचेवर अनेक गंभीर गुन्ह्यांसह (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी) मोक्काच्या गुन्ह्यात गेली पाच महिन्यांपासून फरार होता. अखेर गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोहवा विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पोना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button