दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक
युनिट सहाची कामगिरी; राहू रोडवरील घटना; घातक शस्त्रे केली जप्त

पुणे : रात्रीच्या वेळी दरोड्याचा तयारीत असणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने राहू रोड येथे पकडले असून त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू, मिरची पुड, नायलॉन दोरी, मोबाईल व मोपेड व इतर साधने असा ७८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
राजन गोपाल नायर (वय ३१), राहुल गोटीराम साळुंखे (वय ३३, दोघे रा. न्यू कोपरे, उत्तमनगर), आकाश तायप्पा कानडे (वय २१, रा. वडारवस्ती, येरवडा), अक्षय मधुकर कोळके (वय २७, रा. रायकर मळा, धायरी), सुरज दिलीप जाधव (वय २८, रा. रविवार पेठ, तांबोळी मशिदजवळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक मंगळवारी रात्री गस्त घालत असताना राहू रोडवर सिद्धी विनायक डेव्हलपर्स या प्रकल्पाच्या जवळ काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट-६ च्या पथकाने सापळा रचून पकडले असून त्यांच्याकडील घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लोणीकंद पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांचे पथकाने केली आहे.