वाघोलीतील गुन्हे शाखा युनिट ६ चे कार्यालय असलेल्या इमारतीबाबत पुणे शहर पोलिसांचे स्पष्टीकरण

वाघोली : लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या वाघोली येथील कार्यालयाची इमारत व जागेबाबत न्यायालयात तक्रारी असल्याचे सोशल मिडीयात प्रसारित होत असल्याने याबाबत पुणे शहर पोलिसांच्या वतीने प्रेसनोटद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पुणे शहर पोलिसांच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हंटले आहे कि, गुन्हे शाखा युनिट ६ चे कार्यालय बाईफ रोड, समृद्धी स्क्वेअर, वाघोली याठिकाणी पहिल्या मजल्यावर २ हजार चौरस फुट क्षेत्रामध्ये कार्यान्वित करण्यात आले असून सदरचे कार्यालय भाडे तत्वावर वापरणेकरीता ११ महिन्यांचे कराराने घेण्यात आले आहे. भाडे आकारणीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र व्यवहार करून संबंधित ठिकाणी पाहणी केली आहे. जागा मालक सागर एकनाथ सातव यांचेकडून नमूद जागेचा नकाशा, कर आकारणी पावती व इतर संबंधित बाब तपासून बांधकाम विभागाने पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचे भाडे ठरविलेबाबत पोलीस विभागास पत्रान्वये कळविले आहे.
गुन्हे शाखा युनिट ६ चे कार्यालय कार्यान्वित असलेली ५.५ जागा मालक सागर सातव यांनी २००८ मध्ये विद्या तुलसुलकर यांच्याकडून खरेदी केली आहे. याच गटातील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस २९.६४ गुंठे जागेमध्ये रहिवासी संकुल बांधण्यात आलेले आहे. त्याजागेमध्ये अनेक व्यक्ती मालक असून त्यांच्येमध्ये आप आपसात न्यायालयीन वाद चालू आहेत. त्या जागेचा आणि समृद्धी स्क्वेअर या इमारतीचे मालकाचा काहीएक संबंध नाही सदरचे इमारतीचे संरक्षक भिंत आहे. सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.