कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर निवडणुक जिंकणार – पठारे

शक्ती प्रदर्शन करत पठारे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

वडगांवशेरी : विरोधात कोणीही उभ राहू देतं कार्यकर्ते आणि जनतेच्या जीवावर शंभर टक्के निवडणूक जिंकणार असल्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सोमवारी (ता. २८ ऑक्टोबर) महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला. यावेळी प्रकाश म्हस्के, भिमराव गलांडे, माजी नगरसेवक महेंद्र पठारे, राजेंद्र उमाप, किशोर विटकर, भैयासाहेब जाधव, काँगेसचे माजी नगरसेवक सुनील मलके, संगीता देवकर, राजू ठोंबरे, रमेश सकट, विल्सन चंदेवळ, शिवसेनेचे सागर माळकर, आनंद गोयल, नितीन भुजबळ, शांताराम खलसे, राजेंद्र खांदवे, आशिष माने, शैलेश राजगुरू, आम आदमी पक्षाचे अमित म्हस्के,  आरपीआयचे सचिन खरात यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, रिपब्लिकन पक्ष (सचिन खरात गट) व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर पठारे म्हणाले,  २००९-२०१४ मध्ये ज्या पद्धतीने वडगावशेरी मतदारसंघात मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करत एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो होतो, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळातही शर्तीचे प्रयत्न करणार आहे. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न यासारख्या समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढणार आहोत. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करणार असल्याचेही पठारे यांनी सांगितले.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button