भामा-आसखेडचे पाणी मिळत नाही तोपर्यंत वाघोलीला टँँकरद्वारे पाणीपुरवठा करा
भाजप हवेली तालुका व युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे मागणी
वाघोली : वाघोलीला (ता. हवेली) जोपर्यंत भामा-आसखेडचे पाणी मिळत नाही तोपर्यंत पुणे महानगरपालिकेकडून पाण्याचे टँँकर सुरु करावे अशी मागणी हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
वाघोलीला भामा-आसखेडचे पाणी मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीने लढा सुरु केला आहे. जोपर्यंत वाघोलीला भामा-आसखेडचे पाणी येत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. लढा सुरु ठेवत भामा-आसखेडचे पाणी वाघोलीला मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिकेकडून पाण्याच्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. वाघोली गाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे टँँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी हवेली तालुका भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, भाजप क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, भाजप हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीपदादा सातव पाटील उपस्थित होते.