पोलीस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलीस दलातील महेश गायकवाड यांची निवड

वाघोली : स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलीसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलीस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची व्याप्ती वाढत जावून आजतयागत संस्थेचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सीआयडी, एसआयडी, ॲन्टी करप्शन ब्युरो, एसआरपीएफ, वायरलेस, पोलीस प्रशिक्षण केंद्र व इतर विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कार्यालयीन स्टाफ असे एकूण १४,३०० सभासद आहेत. संस्थचे अधिकृत भागभांडवल सुमारे ५०० कोटी रुपये असून संस्थेचा दरवर्षी ऑडीट वर्ग अ दर्जा आहे. संस्थेची सन २०२४-२०२९ कालावधीची पंचवार्षिक निवडणूक ६ मार्च २०२४ रोजी पार पडलेली आहे. त्यामध्ये नवपरिवर्तन पॅनल १२ विरुध्द १ असा बहुमताने विजयी होवून नवनिर्वाचित १३ उमेदवार निवडून आलेले आहेत.

गुरुवार २० जुन २०२४ रोजी संस्थेच्या १०४ वा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सभासदांना अथर्व नेत्रालय अँड रिसर्च प्रा. लि. यांचेतर्फे नेत्रतपासणी व डायबेटीक असोशिएशन ऑफ इंडीया तर्फे मधुमेह तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याचा सेवानिवृत्त कर्मचारी व सभासद यांनी लाभ घेतला.

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर घोरपडे, उपाध्यक्ष श्री.आकाश फासगे, खजीनदार श्री.उदय काळभोर यांचे उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व संचालकांनी ठराव घेवून सर्वानुमते संस्थेचे सभासद श्री.महेश वसंतराव गायकवाड यांची ‘तज्ञ संचालक’ या पदावर बिनविरोध निवड केली.

नवनिर्वाचित तज्ञ संचालक श्री.महेश गायकवाड हे पुणे ग्रामीण पोलीस दलात सायबर क्राईम या विभागात कार्यरत असून त्यांनी यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा येथे आपले चांगले कार्याचा ठसा उमटविलेला आहे. त्यांना यापूर्वी पोलीस दलातील चांगले कामगिरीबद्दल मा.पोलीस महासंचालक पदक देवूनही गौरविण्यात आलेले आहे. पोलीस सोसायटी कामकाजही ते उत्कृष्टपणे करतील याची खात्री असल्यानेच त्यांची या पदावर निवड केल्याचे दिसून येते.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी प्रामाणिक व गतिमान प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही नवनिर्वाचित संचालक श्री.महेश गायकवाड यांनी दिली.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button