‘कृषी विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान गंगा घरोघरी’
कृषी विभागाकडून शेतकरी ते शास्त्रज्ञ थेट संवाद कार्यक्रम संपन्न

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ संवाद पेरू लागवड उत्पादन समस्या व उपाय थेट शेतकऱ्यांच्या शेतामधून या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन सोमवारी (दि. २ ऑगष्ट) रोजी विजय जगताप यांच्या शिंदेवाडी (ता. हवेली जि. पुणे) येथील शेतामधून करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये शिंदेवाडी, लोणी काळभोर, उरुळी कांचन परिसरातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या पेरू फळ पिकांबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश जाधव, सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या, डॉ. विकास भालेराव, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोग्यशास्त्र यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सोमनाथ माने, डॉ. सुनील जोगदंड, डॉ. रवींद्र कारंडे यांनी केले होते.
शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, वाघोली मंडळ कृषी अधिकारी जितेंद्र रणवरे, कृषी पर्यवेक्षक गणेश सुरवसे, कृषी सहाय्यक कासारे, कृषी सहाय्यक गावित, कृषी मित्र रामदास सातव व परिसरातील पेरू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
‘कृषी विद्यापीठ आपल्या दारी ‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट शास्त्रज्ञांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल.
– सपना ठाकूर (तालुका कृषी अधिकारी, हवेली)