डॉ. संजय कच्छवे दैठणकर यांचा पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
![](https://deccanbulletin.in/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Image-2024-10-29-at-18.59.43_0011a413-780x470.jpg)
परभणी : डॉ. संजय कच्छवे दैठणकर यांनी शिवसेना, भाजप, हिंदु, हिंदुत्ववादी, गोरगरीबांना पर्याय देण्यासाठी पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदारसंघातून २९ ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पार्थपुर (पाथरी) विधानसभा मतदार संघात परंपरागत कांग्रेसी विचारधारेचा एक उमेदवार कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरूद्ध हिंदुत्ववादी व गोर गरीबांची बाजु घेणारा शिवसेना-भाजपाचा उमेदवार अशी लढत होत होती. परंतु यंदा कॉंग्रेसचे सुरेश देशमुख वरपुडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर, बाबा जानी दुर्रानी यांचेमध्ये लढत होणार आहे. यामधे शिवसेना, भाजपा, हिंदु, हिंदुत्ववादी व गोरगरीबांसाठी पर्यायच ठेवला नसल्याने डॉ. संजय कच्छवे दैठणकर हे निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
डॉ. संजय कच्छवे दैठणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवारातील अखील भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या कडवट हिंदुत्ववादी संघटनांमधे प्रदेश स्तरावर प्रमुख राहीले आहेत. तसेच निवासी डॉक्टर संघटनेचे (एमएआरडी) प्रदेश प्रमुख राहीले आहेत.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, पाथरी विधानसभा मतदार संघ पक्ष निरीक्षक, जिल्हाप्रमुख, पाथरी विधानसभा मतदार संघ प्रमुख, लोकसभा समन्वयक (हिंगोली लोकसभा, संभाजीनगर लोकसभा, कल्याण लोकसभा) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.