पुणे जिल्हा भाजप सचिवपदी सचिन जाधव तर वाघोली शहर अध्यक्षपदी केतन जाधव यांची निवड

वाघोली : पुणे जिल्हा भाजप सचिवपदी केसनंद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन संभाजी जाधव तर भारतीय जनता पार्टी वाघोली शहर अध्यक्षपदी केतन भगवानराव जाधव यांची निवड करण्यात आली. पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे.
याप्रसंगी भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सुदर्शन चौधरी, अविनाश बवरे, भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. केतन जाधव हे राज्यस्तरीय खेळाडू म्हणून परिचित असून त्यांचे सामाजिक योगदान देखील मोठे आहे. तसेच सचिन जाधव माजी उपसरपंच असून त्यांचा गावातील विविध विकास कामे मार्गी लावले आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा ते नेहमी अग्रेसर असतात. भारतीय जनता पक्षाने दोघांच्याही सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.