विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
भाजपा हवेली तालुका युवा मोर्चाच्या वतीने १००० वृक्षांची केली जाणार लागवड; वाघोलीतील १२ सोसायट्यांमधून सुरुवात

वाघोली : भाजपा हवेली तालुका युवा मोर्चाच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन सप्ताह अभियानाची वाघोलीतील बारा सोसायट्यांमध्ये वृक्षांची लागवड करून सुरुवात करण्यात आली आहे. वृक्ष लागवड अभियान आठवडाभर सुरु ठेवण्यात येणार असून यामध्ये एक हजार विविध वृक्षांचे रोपण करून संवर्धन करण्यात येणार असल्याची महिती भाजपा युवा मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी सांगितले.
भाजपा हवेली तालुका युवा मोर्चाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि २२ जुलै) रोजी वाघोलीतील बारा सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुनील चाचा जाधवराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानास सुरुवात करण्यात आली. वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम २२ जुलै ते २८ जुलै पर्यंत चालणार आहे. तरुण उद्योजक केतन जाधव यांनी स्वखर्चातून विविध प्रकारची १००० वृक्ष उपलब्ध करून दिली असून या वृक्षांची लागवड व संवर्धन केले जाणार आहे. येत्या आठवड्यात संपूर्ण हवेली तालुका व वाघोली गावातील सोसायट्यांमध्ये वृक्षा रोपण करण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी सांगितले. यावेळी उद्योजक केतन जाधव यांचेसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सोसायटीमधील सभासद व मान्यवर उपस्थित होते.
विविध प्रकारच्या १००० देशी झाडांचे वाघोली गावातील सोसायट्यांमध्ये व हवेली तालुक्यातील विविध ठिकाणी रोपण करण्यात येणार असून त्यांचे संगोपन सुद्धा करण्यात येणार आहे.
– केतन जाधव (तरुण उद्योजक तथा सामजिक कार्यकर्ते, वाघोली)
भाजपा युवा मोर्चा हवेलीच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त १००० वृक्ष लागवड अभियानाला वाघोलीतील १२ सोसायट्यांमधून सुरुवात करण्यात आली आहे. केवळ झाडांची लागवड केली जाणार नाही तर त्याचे संगोपन देखील केले जाईल.
– अनिल सातव पाटील (भाजपा युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष)