एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे काम मार्च पासून सुरु होण्याचे संकेत

आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांचा पाठपुरावा; खराडी ते शिरूर बायपासपर्यंत होणार उड्डाणपूल   

मुंबई : शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी गेल्या काही दिवसातच पुणे-नगर महामार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवली. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला. नागरिकांना कायमस्वरूपी कोंडीतून मुक्त करण्यासाठी आता आमदार कटके यांनी अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील एलिव्हेटेड खराडी बायपास ते शिरूर या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हरच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात  करावी यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे खराडीपासून ते शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे. तसेच भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली असल्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले. 

मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी झालेल्या विशेष बैठकीत सदर प्रकल्पाबाबत आमदार कटके यांनी सविस्तर चर्चा केली. शिरूर-हवेली मतदार संघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या ६० किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधीत विभागांनी सकारात्मकता दर्शविली आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्यावरून महामेट्रो त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी वाहने आणि तळातील रस्त्यावरून अवजड वाहतूक व्यवस्था असणार आहे. हा अत्याधुनिक उड्डाणपूल खराडीपासून ते शिरूर बायपासपर्यंत होणार आहे. खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला एक्झीट असणार आहे. या तीन मजली उड्डाणपुलामुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार येणार आहे. कामाला प्रत्यक्षात मार्च २०२५ च्या महिन्या अखेरीस सुरूवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत असून शिरूर-हवेली मतदारसंघातील सर्वात मोठा प्रकल्प मंजूर झाला असल्याचे समाधान आहे.

– ज्ञानेश्वर आबा कटके  (आमदार, शिरूर-हवेली)

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button