तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

लोणीकंद तपास पथकाची कारवाई; वाघेश्वर मंदिराजवळ घेतले ताब्यात  

वाघोली  :  मागील तीन महिन्यांपासून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या एकास लोणीकंद तपास पथकाने वाघेश्वर मंदिर चौकात अटक केली आहे.

किशोर संजय गायकवाड (वय १९, रा. गोरे वस्ती, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी हा वाघोली येथील वाघेश्वर मंदिर गेट जवळ थांबला असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सदर ठिकाणी जावून खात्री केली असता नमूद वर्णनाचा इसम त्या ठिकाणी दिसून आला. तपास पथकाने मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास अटक करण्यात आली आहे.

सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहा. पो. आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक वेताळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस उपनिरीक्षक दळवी, सहा. फौजदार मोहन वाळके, पोना अजित फरांदे, पोना कैलास साळुके, पोना विनायक साळवे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांनी केलेली आहे.

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button