बंद असलेल्या पथदिव्यांबाबत मनसे आक्रमक

वाघोलीतील केसनंद फाटा येथे महापालिकेच्या विरोधात आंदोलन

वाघोली  :   विद्युत महावितरण कंपनीचे कोटी रुपये थकीत बिल असल्यामुळे वाघोली येथील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. अद्यापही पथदिवे सुरु झाले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली वाघोली (ता. हवेली) येथे केसनंद फाटा चौकामध्ये पुणे महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला.

वीज महावितरणचे कोटी रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे वाघोली येथील पथदिवे मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघोली ग्रामपंचायतचा महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे थकीत बिल भरण्याची जबाबदारी महापालिकेची असून त्वरित बिल भरून पथदिवे सुरु करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवार (दि. २१ जुलै) रोजी मनसेचे विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली केसनंद फाटा चौक येथे पुणे महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला. यापुढे मनसे नागरिकांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे काम करणार असल्याचे विभाग अध्यक्ष प्रकाश जमधाडे यांनी सांगितले.

या प्रसंगी दत्ता व्यवहारे, सुनिल विटकर, हितेश बो-हाडे, काका गायकवाड, मंगेश सातव, आनंद राजीवाडे, रोशन नवले, अजय पालवे, स्वप्नराज खेडकर, गोरक्ष म्हस्के, अनिकेत मुळीक, तुषार चव्हाण, गणेश तापकीर, रितेश बो-हाडे, श्रीराज जाधव, जगदिश चौधरी, रुतिक आव्हाळे आदी उपस्थित होते.

 

सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे नेहमीच अग्रेसर आहे. यापुढे देखील मनसे आक्रमकपणे आंदोलने करून सामन्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे.

– ॲड. गणेश म्हस्के (विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष, मनसे)

 

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button