वाघोलीत खवय्यांच्या सेवेत ‘यागा’ फ्रेश फार्म डेअरी अँड स्वीट
महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत 'यागा'चे उद्घाटन

- 'पिराजीस' केकच्या यशस्वी वाटचालीनंतर वाघोली व परिसरातील खवय्यांना 'यागा' फ्रेश फार्म अँड स्वीट्स शॉपच्या माध्यमातून विविध स्वरुपाची मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत. स्वच्छता, सर्विस, क्वालिटी देणारे पहिले हायजेनिक असे पुणे-नगर महामार्गावरील शॉप असणार आहे.
वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील ‘यागा’ (YAAGA) स्वीट आणि डेअरी प्रॉडक्ट शॉपचे उद्घाटन मंगळवार (दि. ६ जुलै) रोजी पुपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, नगरसेवक व भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे, मा. नियोजन समिती सदस्य संजय आप्पा सातव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेश बापू कुटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप आबा सातव, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सातव व भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक, भाजप हवेली तालुका उपाध्यक्ष प्रदीप दादा सातव पाटील, माजी उपसरपंच मारुती अण्णा गाडे, सुनील चाचा जाधवराव, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप, उद्योजक संदीप अप्पा जाधव, उद्योजक केतन जाधव, मंगेश अण्णा सातव, जीके फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप कटके आदि उपस्थित होते.
पिराजीस केक नंतर आता नागरिकांच्या सेवेसाठी यागा (YAAGA) फ्रेश फार्म डेअरी अँड स्वीट या नवीन ब्रॅण्डचे लॉन्चिंग केले असून स्वीट आणि डेअरी प्रॉडक्टमध्ये संपूर्ण हायजेनिक प्रॉडक्ट तयार केले जातात. वाघोली व परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन यागा ब्रँड लॉन्च केला असून गुणवत्ता, सेवा आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच पुढे काही दिवसात पुणे शहरामध्ये सगळ्या भागांमध्ये ‘यागा’चे शॉप ओपन करणार आहे. – सचिन सोमनाथ सातव (डायरेक्टर, यागा फ्रेश फार्म डेअरी अँड स्वीट)