भाजप युवा मोर्चा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल नायक

हिंगोली : भाजप युवा मोर्चा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल साहेबराव नायक (देशमुख) माळशेलुकर यांनी निवड करण्यात आली. हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. पक्षाने हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून पक्षाचे ध्येयधोरणे सामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नायक यांनी सांगितले.
यावेळी भाजप युवा मोर्चा हिंगोली जिल्हा अध्यक्ष गणेश बांगर, युवा नेते शिवजीराव मुटकुळे, के के शिंदे, हमीद प्यारेवाले, प्रशांत गोल्डी, डॉ भानुदास वामन, गजानन नायक, सचिन शिंदे, पद्माकर नायक (अध्यक्ष सोशल मिडिया हिंगोली विधानसभा), सतीश नायक, महेश नायक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.