तलवार घेऊन दहशत माजविणारा सराईत जेरबंद

शिक्रापूर गुन्हे शोध पथकाची कामगिरी; जिवंत काडतुसासह गावठी पिस्टल जप्त

वाघोली  :  शिक्रापूर (ता. शिरूर) हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास  शिक्रापूर गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्टलसह अटक केली आहे.

वैभव संभाजी अदक (वय २३ तळेगाव ढमढेरे रोड, शिक्रापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि. १२ जुलै) रोजी शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर एक इसम हातात तलवार घेऊन दहशत करीत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई निखील रावडे यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर मिळाली. गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम हा हातामध्ये तलवार घेऊन हवेत फिरवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसून आले. गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने त्याला तलवारीसह पकडले त्याबरोबर त्याचेकडील चारचाकी गाडी ताब्यात घेऊन तपासणी केली असता गाडीमध्ये चालकाच्या सीट खाली एक काळ्या रंगाचा गावठी बनावटीचा पिस्टलसह एक जिवंत काडतूस व डिकीमध्ये धारदार सुरा आढळून आला. पोलिसांनी कारसह एकूण ३ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून कंपन्यांमधील कंत्राटदारांना व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करत होता. आरोपीने कोणाकडे खंडणी मागितली असेल तर शिक्रापूर पोलिसांकडे संपर्क करावा असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन आतकरे, पोह. जितेंद्र पानसरे, पोना अमोल दांडगे, पोना श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, विकास पाटील, सागर कोंढाळकर, पोशि जयराज देवकर, राहुल वाघमोडे, किशोर शिवणकर, अशोक केदार, लखन शिरसकर यांनी केली आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page