स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्या    

महामंत्री भाजप युवा मोर्चाचे योगीराज शिंदे यांची निवेदनाद्वारे मागणी 

वाघोली  :  मयत स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे राज्य शासनाने पन्नास लाखांची मदत द्यावी तसेच स्वप्नीलच्या बहिणीला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अन्यथा युवा मोर्चाच्या वतीने एमपीएसीच्या पुस्तकांची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा हवेली तालुका महामंत्री भाजप युवा मोर्चाचे योगीराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्निल लोणकर या युवकाने विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सरकारच्या ढिसाळ कारभार याला कारणीभूत आहे. मयत स्वप्नीलच्या कुटुंबाला किमान ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी व त्याच्या बहिणीला तात्काळ सरकारी नोकरीत समाविष्ट करावे अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button