वाघोलीतील वार्ड एक मधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी
उपसरपंच महेंद्र भाडळे यांची माहिती

वाघोली : वाघोलीतील (ता. हवेली) वार्ड क्र.1 मधील अनेक वर्षांपासून अडचणी निर्माण झाल्यामुळे प्रलंबित असलेला अत्यंत महत्वाचा सांडपाण्याचा प्रश्न सुटला असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी दिली आहे.
वार्ड क्रमांक १ मध्ये कल्पक होम्स, सोलासीया ते बाईफरोड पर्यंत आतील ड्रेनेज लाईनचे काम पुर्ण झाले असल्याने कल्पक होम्स, सोलासीया, फेज 1, फेज 2, गुलमोहर, गंगा अल्फा पॅराडाईस, सुप्रिम आंगन या परिसरातील सांडपाण्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याशिवाय बाईफ रोडची मुख्य ड्रेनेज लाईनसाठी अनेक अडथळे येत असताना सर्व समस्या दूर करुन ग्रामपंचायतमार्फत या ठिकाणी माजी जिल्हापरिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधरा उबाळे, ग्रा.पं. सदस्य शिवदास उबाळे, पुजाताई भाडळे, माजी उपसरपंच समीर (आबा) भाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 2 कोटी 50 लाख रुपये इतका मोठा ग्रामनिधी उपलब्ध करुन जवळपास या भागातील 70 टक्के काम पूर्ण झाले असून सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले आहे. उर्वरित राहिलेल्या कामांसाठी देखील पुणे मनपा प्रशासनाच्या संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा आहे. त्याला देखील मनपा प्रशासन अनुकूल असल्याचे उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी सांगितले. त्यामुळे या भागातील मुळीक लक्जरीया, बी ए वरमोंट, दाभाडे वस्ती, दत्तप्रसाद नगर, आयवरी, सवन्ना, सिल्वर स्प्रिंग, वाईल्डवुड, अक्षय संस्क्रुती, वास्तु गोल्ड, कांचन पुरम सिध्दीविनायक नगरी, आयरीस, या भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात यश आले आहे.
अनेक वर्षापासुन रखडलेले मुलभुत प्रश्न जसे मजबूत रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी असे अनेक मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहे.
– महेंद्र भाडळे (उपसरपंच, वाघोली)
वाघोली मधील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, अंतर्गत मजबूत रस्ते, पथदिवे तसेच नागरिकांसाठी इतर सोयीसुविधा देण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार निधी, खासदार निधी यामधून विकास कामे केली आहेत. यापुढील काळात देखील विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे.
– समीर भाडळे (माजी उपसरपंच, वाघोली)