खराडी येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
खराडी पोलिसांची कारवाई; ६ पिडीत महिलांची सुटका

पुणे : खराडी येथील थिटे नगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यास खराडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहा पिडीत महिलांची सुटका करून अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेनखोकै किपगेन (रा. मणिपुर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. २४ एप्रिल) खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना गोपणीय बातमीदारामार्फत सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अॅन्ड वेलनेस गोल्ड प्लाझा बिल्डींग, दुसरा मजला थिटे नगर खराडी-मुंढवा रोड, खराडी या ठिकाणी स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालतो अशी खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन बनावट गिऱ्हाईक पाठवून सदर ठिकाणी छापा टाकला. स्पामध्ये शोध घेतला असता थायलंड देशाच्या तीन महिला, नागालॅन्ड राज्याची एक महिला व एक मणिपुर राज्याची महिला तसेच पुणे येथील एक महिला रहिवाशी आढळून आल्या.
सरकारतर्फे महिला पोलीस अंमलदार पुजा डहाळे यांच्या फिर्यादीवरुन खराडी पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एकास अटक करून न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील पाहिजे आरोपी विकास ढाले याचा पोलीस शोध घेत आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे हे स्वतः करीत आहेत.
पिडीत सहा महिला यांची सुटका करुन त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने पिडीत महिला यांना सुरक्षिततेकामी महिला सुधारगृहात ठेवणेबाबत आदेश केले.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अर्जुन बुधवंत, अमोल भिसे, सचिन पाटील, अक्षय गार्डे, सुरज जाधव, जयवंत श्रीरामे तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती मेमाणे, पुजा डाहाळे, अर्चना गोफणे यांनी केली आहे.