वाघोली-डोमखेल रोड परिसरातील तुंबलेल्या गटार लाईनचा प्रश्न मार्गी
वाघोली-डोमखेल परिसरातील नागरिकांना दिलासा

वाघोली : वाघोली-डोमखेल रोडवरील ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटी, अनुसया पार्क आणि परिसरातील काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या गंभीर बनण्याची शक्यता होती. मात्र, भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या पुढाकाराने आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे ही समस्या तातडीने सोडवण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वाघोली-डोमखेल रोडवरील ऐश्वर्या लक्ष्मी सोसायटी, अनुसया पार्क परिसरातील काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबले होते. भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी प्रत्यक्ष परिसराची पाहणी करून नागरिकांची समस्या मार्गी लावण्यासाठी तातडीने पुणे महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. त्यानंतर जेटिंग मशीनच्या मदतीने ड्रेनेज लाईन साफ करून तुंबलेली गटार व्यवस्था सुरळीत करण्यात आली.
यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनच्या तत्परतेमुळे समस्येचे जलद निराकरण शक्य झाले, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.