खंडोबा प्रसादिक दिंडीतील वारकऱ्यांसाठी फिरते शौचालय
कै. हौसाबाई आव्हाळे पाटील यांच्या स्मरणार्थ मा. पंचायत समिती सभापती नारायण आव्हाळे पाटील यांच्याकडून भेट
वाघोली : कै. हौसाबाई गुलाबराव आव्हाळे पाटील यांच्या स्मरणार्थ माजी पंचायत समिती सभापती यांच्याकडून खंडोबा प्रासादिक दिंडीतील वारकऱ्यांसाठी फिरते शौचालय भेट देण्यात आले.
मा. सभापती आव्हाळे यांनी शौचालय भेट दिल्याबद्दल आव्हाळवाडी ग्रामस्थ व खंडोबा प्रासादिक दिंडीच्या वतीने मा. सभापती आव्हाळे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप (दादा) कंद, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके, पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा. सदस्य संजय (अप्पा) सातव पाटील, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश (बापू) कुटे, मीनाकाकी सातव पाटील, पल्लवी आव्हाळे, संदेश आव्हाळे, प्रसादिक दिंडीचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, ग्रामपंचायतचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.