राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पुणे शहर सरचिटणीसपदी प्रकाश जमधडे

वाघोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी प्रकाश जमधडे यांची निवड करण्यात आली. या आधी ते पक्षाचे हवेली तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे शहर अध्यक्ष प्रशांत (दादा) जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित पुणे शहर सरचिटणीस जमधडे यांनी सांगितले.
प्रकाश जमधडे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. समाजातील जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्यांनी आंदोलनातून विविध नागरी समस्या मार्गी लावल्या. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी अल्पसंख्याक विभाग सामाजिक माध्यम प्रतिनिधी पुणे जिल्हा झाकिर पठाण, फइम शेख, रोहन गुरुभेट्टी ब्लॉग अध्यक्ष वाघोली आदी मान्यवर उपस्थित होते.