डेक्कन बुलेटीन इफेक्ट! लसीकरण केंद्रामध्ये लावण्यात आले माहिती फलक
हवेली तालुका क्रीडा आघाडी व भाजप युवा मोर्चाच्या मागणीला यश
वाघोली : सरकारी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण अभियानासंदर्भात माहिती फलक लावून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टी हवेली तालुका क्रीडा आघाडीच्या वतीने जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे करण्यात आली होती. याबाबत “डेक्कन बुलेटीन” ने बातमी प्रकाशित केली होती. संबधित विभागाने बातमीची दखल घेऊन वाघोली येथील सरकारी लसीकरण केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह माहिती फलक लावण्यात आले आहे.
संपूर्ण देशामध्ये भारत सरकारद्वारे मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान मागील चार महिन्यांपासून चालू करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सरकारी लसीकरण केंद्रामध्ये व प्रथमदर्शनी लसीकरणसंदर्भात माहिती फलक लावून त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात यावा अशी मागणी भाजप क्रीडा आघाडीचे हवेली तालुकाध्यक्ष विजय जाचक व भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश तात्या सातव यांनी (दि. २३ जून) एका निवेदनाद्वारे जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे केली होती. याबाबत “डेक्कन बुलेटीन” वृत्त प्रकाशित केले होते. संबधित विभागाकडून वृत्ताची दखल घेऊन लसीकरण केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या फोटोसह माहिती फलक लावण्यात आले आहे.