बेकायदेशीर धारदार शस्त्र जवळ बाळगले प्रकरणी एकजण ताब्यात
गुन्हे शाखा युनिट-६ ची कामगिरी

वाघोली : बेकायदेशीर धारदार शस्त्र जवळ बाळगले प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने एकास वाघोली येथील खांदवे नगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
राहूल रामू काष्टेकर (वय २२ रा. आपले घर, खराडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक सोमवारी (दि. २६ मे) वाघोली गावचे हद्दीत गस्तीवर असताना एक इसम जिनियस स्कूलकडे जाणाऱ्या खांदवे नगर, परिसरात थांबला असून त्याचेकडे धारदार शस्त्र असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदार मार्फत पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने सदर ठिकाणी जावून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ लोखंडी धारदार शस्त्र मिळून आले.
आरोपी हा विमानतळ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचेविरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यारबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, नितीन धाडगे, गणेश डोंगरे, कीर्ती मांदळे, प्रतीक्षा पानसरे, पोअं दत्ता गोरे, राहुल उगले यांनी केली आहे.