केसनंद-लोणीकंद रोडवरील तीव्र वळण सरळ करा
माहिती सेवा समितीच्यावतीने मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा

वाघोली : लोणीकंद-केसनंद रोडवर असणाऱ्या जोगेश्वर मंदिरासमोरील धोकादायक तीव्र वळण असल्याने अनेक अपघात होऊन नगरीकांना जीव गमवावा लागत आहे. येथील वळण कमी करून सरळ कराव व दोन्ही बाजून स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी माहिती सेवा समितीच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एक महिन्यात मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हंटले आहे कि, नुकतेच अष्टविनायक महामार्गाच्या माध्यमातून थेऊर ते लोणिकंद या रोडचे काम पुर्ण झाले आहे अनेक ठिकाणी रोडचे काम खूप निकृष्ट दर्जाचे झाले आहे कमी रुंदीकरण झाले आहे त्यामुळे खुप अपघात होत आहेत. केसनंद जोगेश्वरी मंदिरा समोर एक तिव्र वळण रस्ता आहे त्याठिकाणी वनविभाची जागा आहे. वनविभागाच्या आडमुठेपणा मुळे त्याठिकाणी वळण सरळ करता आले नाही. त्यांनी काही गरज नसताना रोडलगत संरक्षक जाळी मारली आहे. त्यामुळे वाहन चालकांना समोरच्या वाहनांचा अंदाज येत नाही व अपघात घडतो. त्याठिकाणी अपघात होऊन अनेक जीव गेले आहेत संबंधित विभागाने त्याठिकाणी ताबडतोब वळण कमी करुण रस्ता सरळ करावा, वनविभागाने लावलेली जाळी काढावी दोन्ही बाजूला स्पिड बेकर लावावेत. एका महिन्यात जर कार्यवाही केली नाही तर माहिती सेवा समितीचे माध्यमातून उपोषण, रस्ता रोको, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक रस्त्यावर फिरुण न देणे असे तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्याकडून देण्यात आला आहे.