Video : शिरूर-हवेलीमधून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर आबा कटके मोठ्या मताधिक्याने विजयी
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी गुलाल उधळून केला आनंदोत्सव साजरा

वाघोली : शिरूर-हवेली मतदारसंघातून ज्ञानेश्वर माऊली कटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा केला. फटके फोडून व गुलाल उधळून जल्लोस साजरा केला.
यावेळी गणेश सातव, विजय जाचक, प्रदीप सातव, प्रसाद सातव, साहेबराव आव्हाळे, सोमनाथ आव्हाळे, राहुल खैरे यांचेसह महायुतीचे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.