तांब्याच्या तारांची चोरी करणारे तिघे जेरबंद

वाघोली पोलीस तपास पथकाची कामगिरी; २४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

वाघोली : वाघोली येथील जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया, लोहगाव रोड येथील गोडावुन फोडून ताब्यांच्या तारा व ताब्यांच्या स्क्रॅपची चोरी करणाऱ्या तीन सराईतास वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने एकुण एकशे सत्तरहून अधिक सीसीटीव्हीची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे तपास करून जेरबंद केले आहे. त्यांचेकडून एकुण चोवीस लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजेंद्र मोतीचंद जैन (वय ५२ रा. बॅरीस्टर, मुंबई), विनोद श्रीपाल जैन (वय ४० कामाठीपुरा गल्ली, मुंबई), सोहेल फिरोज शेख (वय २२ वर्षे  रा. दारुखाना कोळसा बंद, गणेश हॉटेलजवळ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (२७ ते २८ एप्रिल) रात्रीच्या सुमारास वाघोली येथील जैन वेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रा.लि लोहगाव रोड येथील गोडावुन फोडून २५ लाख रुपयांच्या ताब्यांच्या तारा व ताब्यांचे स्क्रॅपची चोरीस गेले होते. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने तपास सुरु केला होता. वाघोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने एकूण १७२ सीसीटीव्हीची पाहणी करुन तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे गुन्हा उघडकीस आणून तीन सराईतांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून ६ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या तांब्याचा तारा व गुन्ह्यात वापरलेला १८ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो (नं. MH 02 FX 1163) असा एकुण २४ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगीरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पोह बाळासाहेब मोराळे, पोह प्रदिप मोटे, पोह प्रशांत कर्णवर, पोशि दिपक कोकरे, पोशि विशाल गायकवाड, पोशि महादेव कुंभार, पोशि साईनाथ रोकडे, पोशि पांडुरंग माने, पोशि प्रितम वाघ, पोशि समीर भोरडे, पोशि मंगेश जाधव, पोशि अमोल गायकवाड यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page