तरुणाला लोखंडी फायटरने बेदम मारहाण
शिरूर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : शिरूर (ता. शिरूर) येथे एका तरुणास जुने भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून तीन जणांनी लाथा, बुक्यांनी तसेच हातातील लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन जणांवर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईराज वाबळे, सिदार्थ शिंदे, निखील वाबळे (सर्व रा. म्हसने ता. पारनेर जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.२४ जुलै) दुपारी फिर्यादी अनिकेत दिलीप पठारे (वय २१ रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहामद) या तरुणाला आरोपींनी जुने भांडण मिटवायचे आहे असे सांगून बोलावून घेतले. ब्रेजा कारने (एमएच १६ सीक्यू ८३३१) आलेल्या तिघांनी पठारे या तरुणाला लाथा, बुक्यांनी व हातातील लोखंडी फायटरने उजव्या कानाच्या शेजारी मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. सदरील घटना शिरूर येथील रेव्हेन्यू कॉलनी येथे घडली असून पठारे याच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.