डॉ. विठ्ठल सातव यांची डॉक्टर्स असोसिएशनच्या सहयोगी सदस्यपदी बहुमताने निवड

निवडीबद्दल आव्हाळे परिवाराकडून डॉ. सातव यांचा सपत्नीक सत्कार

वाघोली वडगावशेरी, चंदननगर, खराडी डॉक्टर्स असोसिएशनच्या सहयोगी सदस्यपदी डॉ. विठ्ठल सातव आणि डॉ, अस्मिता बहिरट यांची बहुमताने निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल शरद आव्हाळे परिवाराकडून डॉ. सातव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या वडगावशेरी, चंदननगर, खराडी डॉक्टर्स असोसिएशनच्या सहयोगी सदस्यपदाच्या निवडणूकीमध्ये तब्बत २३१ डॉक्टर्स सदस्यांनी उस्फूर्तपणे सभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. योगेश गायकवाड आणि डॉ. शैलेंद्र तायशेटे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.

निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मतं – डॉ. विठ्ठल सातव (१८९), डॉ. अस्मिता बहिरट (१६१), डॉ प्रतिभा चुंबळे (८२) मते पडली. डॉ. विठ्ठल सातव आणि डॉ. अस्मिता बहिरट यांची डॉक्टर्स असोसिएशनच्या सहयोगी सदस्यपदी बहुमताने निवड झाली. बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

अगरवाल मॅटर्निटी व जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अर्चना व अनिश अगरवाल यांचे सहकार्य लाभले. डॉ. सातव आव्हाळवाडी गावाचे सुपुत्र असल्याने त्यांचा ग्रामस्थातर्फे व आव्हाळे परिवारातर्फे सापत्निक सन्मान करण्यात आला.

आव्हाळवाडी येथे डॉ. विठ्ठल सातव यांचा सत्कार 

डॉ. विठ्ठल सातव हे आव्हाळवाडी गावाचे सुपुत्र असून प्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ आहेत. पुण्यात आकाश आय क्लिनिक च्या माध्यमातून गेली २५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ. सातव यांनी इंटरनेशनल आर्यनमान स्पर्धा व कॉम्रेड्स मॅरेथॉन अशा प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या आहेत. वैद्यकीय क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहेत. आव्हाळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते शरद आव्हाळे परिवाराकडून डॉ. सातव यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button