वाघोली येथील महिला एक वर्षासाठी तडीपार

गांजा बाळगणे, चोरी करणे आदी गंभीर गुन्हे आहेत दाखल

वाघोलीवाघोली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गांजा विक्री गुन्ह्यातील महिला छकुली राहुल सुकळे (रा. वाघोली, वय २४) हिस पुणे शहर पोलीस परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

छकुली सुकळे विरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात बेकायदा गांजा बाळगणे, पोलिसांच्या ताब्यातून पसार होणे, चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वाघोली व परिसरात दहशत निर्माण केल्याने रहिवाशी दडपणाखाली वावरत होते. लोकांच्या जीवितास, मालमत्तेस व शारीरिक स्वास्थास धोका निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाल्याने कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने वाघोली पोलिसांनी तिच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा ५६ प्रमाणे तडीपार करण्याचा प्रस्ताव उपायुक्त हिम्मत जाधव यांच्याकडे पाठविला असता जाधव यांनी प्रस्ताव मंजूर करून एक वर्षाकरिता तडीपार केले आहे.  
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैजिनाथ केदार,  महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलीस हवालदार प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, महादेव कुंभार, अमोल गायकवाड, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, प्रितम वाघ, समीर बोरडे, मंगेश जाधव यांनी केली आहे.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button