Video: कल्याणीनगर मधील ‘पब’वर माजी नगरसेवकाच्या मुलाचा राडा

प्रकरण मिटविण्यासाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या मुलाचाही सहभाग?

पुणे कल्याणी नगर मधील नेहमी वादग्रस्त असलेल्या पब मध्ये येरवड्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाने प्रचंड राडा केला. पबची तोडफोड झाली. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री घडला असून हे प्रकरण बाहेर परस्पर मिटविण्यात आले. मात्र तरीही हा पब दुसऱ्या दिवशी चालूच होता. अखेर येरवडा पोलिसांनी या पबला सील ठोकले आहे.

कल्याणी नगर मधील डी मार्ट असलेल्या इमारतीच्या वर वेगवेगळ्या नावांनी पब चालविला जातो. हा पब नेहमी चर्चेत असतो. या पबच्या तक्रारी स्थानिकांनी अनेकवेळा पोलिसांकडे, गृह मंत्र्याकडे केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क यांनी देखील हा पब अनेकवेळा सील केला होता. वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत राहिलेला हा पब आता वेगळ्या नावांनी रात्री उशिरा पर्यंत सुरूच असतो. आवाज बाहेर येऊ नये अशी व्यवस्था केलेली आहे. अगोदरचे नाव बदलून आता वेगळ्या नावांनी सुरू होता.

गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री या पबवर मुलींवरून तरुणांमध्ये वाद झाला. वाद झाल्यामुळे येरवड्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाला बोलविण्यात आले. त्याने इतर मुलांसोबत जाऊन पबमध्ये राडा केला. मग बाऊंसर, कामगार यांनी माजी नगरसेवकाच्या मुलाची धुलाई केली. दारूच्या बाटल्या काचांचा खच पडला होता. दोन्ही बाजूने प्रतिकार सुरू होता. येरवडा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरण मिटविण्यासाठी विधानसभेचे नूतन उपाध्यक्ष यांचा मुलगा मध्यरात्री येरवडा पोलीस ठाण्यात आल्याची चर्चा आहे. त्या रात्री दोन्ही पार्टीत आपआपसात चर्चा झाली. प्रकरण मिटल पण नाही, अन् तक्रार पण दाखल झाली नाही. दुसऱ्या दिवशी पासून या प्रकरणाची जोरदार चर्चा येरवड्यात सुरु झाली. त्यानंतर एका भाईने हे प्रकरण परस्पर मिटविल्याची चर्चा आहे. दरम्यान, वांरवार या पबच्या तक्रारी असताना कोणाच्या आशीर्वादाने हा पब वेगवेगळ्या नावाने सुरू असतो असा प्रश्न कल्याणीनगर मधील रहिवाशांना पडला आहे. कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवींद्र शेळके म्हणाले, पबवर वाद झालेनंतर पोलिस जागेवर गेले होते. मात्र आतापर्यंत कोणीही तक्रार दिली नाही. सदर पब हा सील करण्यात आला असल्याचे सांगितले.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button