गुन्हे शाखा युनिट सहाची पायी पेट्रोलिंग
लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन

- » रेकॉर्डवरील व तडीपार आरोपींचे थांबण्याची ठिकाणे केली चेक
- » चांगल्या वर्तवणुकीबद्दल विधी संघर्षीत बालकांचे समुपदेशन
पुणे : वाढत्या गुन्हेगारींच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या पायी पेट्रोलिंग आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाकडून पायी पेट्रोलिंग करत अभिलेखावरील व तडीपार असलेले आरोपींचे थांबण्याची व राहण्याची ठिकाणे चेक करण्यात आली. पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगमुळे गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसणार असल्याची भावना व्यक्त होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शनिवारी (दि. ८ जुलै) युनिट-६ च्या पायी पेट्रोलिंग मोहीम राबविण्या आली. गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी त्यांचे टीमसह लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत कवडीपाट, लोणी स्टेशन, पठारे वस्ती, इराणी वस्ती, इंदिरानगर, लोणीगाव, गुजर वस्ती, समतानगर, कदम वाकवस्ती या परिसरात राहणाऱ्या आरोपींची थांबण्याची ठिकाणे चेक केली. तसेच इतर भागात सतर्क पायी पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील, तडीपार आरोपी यांच्या राहते घरी जावून तपासणी केली. त्याचबरोबर चांगल्या वर्तवणुकीबद्दल विधी संघर्षीत बालकांना समुपदेशन देखील केले आहे.
पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील एकूण २९ आरोपी चेक करण्यात आले. तसेच लोणीकाळभोर टोल नाक्याजवळ कर्ण कर्कश सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारास ताब्यात घेऊन त्याचेवर वाहतूक पोलीस विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पायी पेट्रोलिंग व कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस नाईक रमेश मेमाणे, प्रतिक लाहीगुडे, संभाजी सकटे, नितीन मुंढे, पोलीस शिपाई ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, अशफाक मुलाणी, शेखर काटे, नितीन धाडगे यांनी केलेली आहे.
कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेऊ नये. जर कोणी गुन्हा किंवा बेकायदेशीर कृत्य करत असेल तर भीती न बाळगता कळवा. माहिती देणाऱ्यांचे नाव गुपित ठेवले जाईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– रजनीश निर्मल (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६)