दारुभट्टी व ताडी गुत्त्यावर कारवाई

गुन्हे शाखा युनिट-६ व लोणीकंद पोलीसांची संयुक्त कारवाई

वाघोली : पेरणी गावातील कोळपे वस्ती येथील दारूभट्टी उध्वस्त केली तर केसनंद येथील ताडीच्या गुलदस्त्यावर गुन्हे शाखा युनिट सहा व लोणीकंद पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (४जुलै) गुन्हे शाखा युनिट-६ चे पथक हद्दीत गस्तीवर असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे यांना पेरणे गावचे हद्दीत कोळपे वस्ती येथे ओढ्यालगत एक महिला दारूभट्टी लावून दारू काढत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदर ठिकाणी पथकाने अचानकपणे छापा घातला. माधुरी रमेश परदेशी (वय ४७ रा. कोळपे वस्ती, पेरणे ता. हवेली जि. पुणे) हातभट्टी लावून दारू काढताना मिळून आली. तिचे ताब्यातील तुरटी, नवसागर, गूळ मिश्रित, लोखंडी बॅरल, दोन हजार लीटर कच्चे रसायन, ३५ लीटर तयार गावठी दारू असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तिचेविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच केसनंद गावचे हद्दीत गस्त करीत असताना पोअं समीर पिलाने व पोअं बाळासाहेब तनपुरे यांना केसनंद गावचे हद्दीत केसनंद ते वाडेबोल्हाई रोडवर पुनीत प्रवीण वडार (वय २० रा. ढोरेवस्ती, केसनंद, ता. हवेली जि. पुणे) हा ताडी विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाला. सदर ठिकाणी पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. यामध्ये त्याचे ताब्यात ताडीचे एकूण ८० फुगे असा एकूण चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला. आहे. त्याचेविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोह रमेश मेमाने, संभाजी सकटे, पोअं सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती नरवडे, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले यांनी केली आहे.

Square logo
DB Team

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button