विद्युत डीपीतील तांब्याच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाची कामगिरी

पुणे : वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या ४ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ च्या पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून १० लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
अबरार बिलाल अहमद, (वय २४, रा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश), आफताब नियामत उल्ला खान (वय ३२, रा. उरण, नवी मुंबई), नफीज हमीद अब्दुल, (वय २३, मुळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर), मोबीन हमीद अब्दुल, (मुळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी ता. शिरुर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हददीत इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत होती. त्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या रोहित्र चोरीतील गुन्हयाचा समांतर तपास युनिट-६ च्या पथकाकडून करण्यात येत होता. तपासामध्ये पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.