दिव्यांग बांधवांकडून सहा. आयुक्त बनकर यांचा सत्कार

वाघोली : नगर रोड वडगावशेरी महापालिका क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ बनकर यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली. बनकर यांची पूर्णवेळ नियुक्ती झाल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी बनकर यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी बनकर यांनी दिव्यांग बांधवांशी आस्थेने सुसंवाद साधला.
गेली अनेक महिन्यांपासून वडगावशेरी मनपा क्षेत्रीय कार्यालयाला पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नामदेव बजबळकर यांचेकडे तात्पुरता असलेला पदभार काढून सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांचेकडे पूर्णवेळ मनपा क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार सोपवला. कार्यक्षम अधिकारी बनकर यांची पूर्णवेळ नियुक्ती झाल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सदिच्छा भेट घेवून सन्मान केला.
याप्रसंगी बनकर यांनी दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसन संदर्भातबाबत सुसंवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. तसेच दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकता दर्शविली.
यावेळी पुणे शहराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा नौशाद शेख, उद्योजक रघुनाथ सातव, प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी वाघोली विभाग प्रमुख किरण शिंपी यांचेसह बाबासाहेब देवढे, तन्मय बहीरट आदी उपस्थित होते.
वडगावशेरी मनपा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी दिव्यांग बांधवांशी प्रदीर्घ चर्चा केली. आस्थेने विचारपूस करून दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली.
– किरण सिंपी (दिव्यांग बांधव)