आव्हाळवाडी येथे सीईओ रमेश चव्हाण यांचा सत्कार

वाघोली : नुकताच पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रमेश चव्हाण यांनी पदभार स्वीकारला आहे. चव्हाण हे आव्हाळवाडी गावाचे स्नेही असून त्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आव्हाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आव्हाळवाडी गावाचे माजी उपसरपंच गणेश (बापू) कुटे, माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब सातव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, माजी उपसरपंच देविदास आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे, सुनील (तात्या) आव्हाळे, पंकज आव्हाळे, अनिल आव्हाळे, तुकाराम बापू आव्हाळे, रोहित (नाना) आव्हाळे, प्रतीक आव्हाळे, सागर आव्हाळे, मयूर आव्हाळे, विशाल आव्हाळे, अभिषेक सातव, आदित्य आव्हाळे, नवनाथ आव्हाळे, हरपळे, प्रवीण (बापू) आव्हाळे, अमोल आव्हाळे तसेच आव्हाळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी रमेश चव्हाण पुणे जिल्हा परिषदेला रुजू झाल्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
– गणेश (बापू) कुटे (भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव)